पेठ जाहिराती

संशययाचे घर - काय खरच पेठ तालुक्यात घडली हि घटना ?

0

संशययाचे घर - काय खरच पेठ तालुक्यात घडली हि घटना ?

आज बाजारात जास्तच गर्दी होती.बाजार तुडुंब भरला होता.त्यात उन्हाचा फटका देखील खूप लागत होता.तो मात्र अनवाणी पायांनी आपली शबनम म्हणजे पिशवी घेऊन फिरत होता.त्याच्या डोक्यात एक एक विचार चाले होते कुणास ठाऊक काय ? पण तो फार घोर विचार करत काहीतरी पुटपुटत चाला होता.का कुणास ठाऊक त्याच्या काय मनात आले आणि एकदम त्याने घराच्या दिशेने धाव घेतली.

तो काहीतरी पुटपुटत रडत होता आणि आपल्या घराकडे धावत होता. कशी बशी आपली शबनम देखील सांभाळत तो पळत होता.अचानक त्याला पळता पळता पायाला ठेच लागली आई ग !!!! आणि तो खाली बसून पडला. पायाचे नख मोडले गेले रक्त फार निघायला लागले होते.पण तशाही परिस्थतीत त्याला घरी पोहोचणे महत्वाचे वाटत होते. त्याचा ४ वर्षांचा मुलगा एकटाच घरी होता.त्याच्या काळजीच्या व्याकुळतेने तो उठला आणि पुन्हा घराकडे धाव घेतली.
संशययाचे घर - काय खरच पेठ तालुक्यात घडली हि घटना ?
संशययाचे घर - काय खरच पेठ तालुक्यात घडली हि घटना ?


दरवाजात आला आणि त्याला आपला मुलगा दिसला तसा तो दरवाजातच बसून पडला आणि रडू लागला एक क्षण त्याने डोळे मिटले आणि त्याला सर्व आठवायला लागले. जेमतेम ५ वर्षापूर्वी तो एका वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कामाला लागला आणि गावाला गेला होता.गावाकडे त्याला एक वेगळाच मान मिळत होता कारण जेमतेम 22 वर्षाच्या वयात त्याने नोकरी मिळवली होती.घरी आल्यावर त्याच्या भोवती आईची एकाच टून टून लागून होती. लग्न कर ...लग्न कर असा एकच धडा तिने लावला होता.

शेवटी हो नय...हो नय... करता करता त्याच्या कडून होकार आला आणि जवळच्याच गावात एक सुंदर मुलीला तो आणि त्याची आई पाहायला गेली. त्याला पाहताच तिचे रूप आवडले सडपातळ बांध्याची ,लांब सडक केस,मोत्यासारखे डोळे ,आणि कोकिळे सारखी तिची वाणी अशी ती सुंदरी त्याच्या डोळ्यात उतरली आणि त्याने पसंती दर्शवली पाहण्याच्या कार्यक्रमा नंतर थोड्या वेळाने घरातून मुलीचाही होकार आला आणि बस लगबगीने त्यांचे लग्न आटोपले.

लग्न झाल्यावर ती आणि तो दोघेही आईचा निरोप घेऊन तालुक्याच्या गावाला परतले.दोघांचा सुंदर संसार चालू झाला.एक मेकांसाठी करण आणि आनंदात जगन हे अस सूत्र त्याचं छान जमल होत.तो रोज पत्रकारिता करण्यासाठी घराबाहेर पडत असे तसा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी तो परतत असे. दिवस खूप आनंदात जात होते अशातच त्यांना एक मुलगा झाला.आता दोघांचे लक्ष त्याच्या संपूर्ण संगोपना कडे गेले.

आपल्या पिलाला काय हव काय नको,त्याला काय आवडत काय आवड नाही? अशा आनंदात दिवसा मागून दिवस लोटले गेले. मुलगा आता ४ वर्षांचा झाला होता.आणि बोबडे बोबडे बोल बोलायला लागला होता. अशा तच एक दिवस तो दमून घरी आला तसा घराचा दरवाज त्याच्या मुलाने उघडला आणि पप्पा आले.!!! पप्पा आले.!!! असा बोलून पप्पाना मिठी मारली त्याची आई संध्याकाळचा स्वयंपाक करत होती. तो हातपाय धुवून बाहेर मुलासोबत गप्पा मारण्यासाठी आला आणि मुलासोबत गप्पा मारू लागला.

मुलगा त्याला त्याच्या बोबड्या बोबड्या शब्दात सांगत होता आज आईने आणि मी किती मज्जा केली.आणि आज एक विशेष गोष्ट घडली एक बुवा आला होता आणि त्याला पाहिल्यावर मम्मीने दरवाजा लाऊन घेतला. मुलाच्या बोलण्यावर जास्त लक्ष न देता त्याने सर्व मज्जा म्हणून घेतले आणि सोडून दिले.रात्रीच जेवण केल आणि तो झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी तो सकाळ सकाळी कामावर गेला आणि काम करून संध्याकाळी पुन्हा घरी आला आजही त्याचे स्वागत त्याच्या मुलांना केले आणि आजही मुला सोबत खेळता खेळता त्याला आजही मुलाने सांगितले पप्पा एक बुवा आला होता ...! आणि तो आल्यावर मम्मी ने दरवाजा लावून घेतला. आजही आपल्या मुलाचे बोलणे त्याने मनावर घेतले नाही आणि जेवण करून तो झोपी गेला.आता रोज तो घरी आल्यावर त्याच्या मुलगा त्याला आपल्या घरी येत असलेल्या बुवा बद्दल सांगू लागला आणि बुवा आल्यावर मम्मी रिज दरवाजा लाऊन घेते हे देखील सांगू लागला अशे ७ ते ८ दिवस गेले रोज मुलगा आपल्या घरी येणाऱ्या बुवा बद्दल आपल्याला सांगतो.

ऑफिस मध्ये गेल्यावर त्याच्या डोक्यात विचार सुरु असतात नेमक आपल्या घरी कोणी न कोणी येत असेल आपण आपल्या बायकोला हे विचारव का ? कोण येतंय बंर ! नको नाही तिला विचारल्यावर तिला उगीच संशय घेतल्यासारखे वाटेल. अश्या विचारातच त्याचा पूर्ण दिवस गेला आज तो घरी आला आणि मुलाने आलेल्या बुवा बदल त्याला सांगितले आणि बुवा आल्यावर मम्मी ने लावलेल्या दरवाजा बद्दल देखील सांगितले. संशयाचे भूत त्याच्या डोक्यात शिरले आणि आपल्या बायकोचे कोणासोबत तरी लफडे चालू आहे.

असे त्याला वाटू लागले.आज तो हे सर्व ऐकल्यावर राग रागात घरातून बाहेर पडला व दारू पिण्यासाठी गेला.आता तो रोज दारू पिऊन येवू लागला व आपल्या बायकोसोबत भांडण करू लागला.कामावरही गैर हजार राहू लागला.एक दिसव त्याने ठरवले कि आपण घरातून गेल्यावर कोण बुवा येतो याचा पत्ता लावायचाच म्हणून त्याने आज ऑफिस मधून अर्धी सुट्टी काढली व दारू पिऊन तो घरी गेला दरवाजा उघडताच त्याच्या मुलाने त्याला मिठी मारली बायको बाथरूम मध्ये कपडे धुवत होती.
आज दिवस तसाच गेला कोणीही आले नाही. म्हणून तो हि गप्प राहिला.दुसऱ्या दिवशी तो पुन्हा कामावर गेला आणि पुन्हा अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन घरी आला आज घरात आत जाताच मुलाने त्याला सांगितले पप्पा तुम्ही यायला थोडा उशीर केलात बुवा एवढ्यात गेला.हे ऐकताच त्याचा राग अनावर झाला आणि कशाचाही विलंब न लावता कोपऱ्यात असणारा पाटा-वरवंटा त्याने उचला आणि आपल्या बायकोच्या डोक्यात घातला तशी त्याची बायको खाली कोसळली आणि निपचित पडली.थोडा वेळ तो तिच्या डोक्यावर वार करतच होता.

भळा भळा रक्त निघत होते.तिचा स्वासन स्वास देखील बंद झाला होता.त्याचा राग शांत झाला आणि त्याला भान आले आपण हे काय करून बसलो.हे त्याच्या लक्षात आले.तो पहिले तर घाबरला आपल्याला पोलीस पकडतील आणि झेल मध्ये टाकतील यक़ भीतीने त्याने आपली शबनम उचली आणि घरातून पळ काढला आज तालुक्याचा बाजार होता लोकांनी तुडुंब भरलेला बाजार आणि त्यात मी असा का केला ? मी हे बरोबर नाही केल ! असा पुटपुटत तो पळत होता.

इतक्यात डोक्यात सुन्न झाल .......आणि आपला मुलगा ....? तो काय करत असेल आता तो तर घरात एकटा असेल असा विचार त्याच्या डोक्यात आला आणि आपल्याला आपल्या मुलाला घेण्यासाठी जावच लागेल त्याला आता कोणी उरला नाही. तो घरात एकटाच असेल अशे विचार त्याच्या डोक्यात आले आणि त्याने अचानक रस्ता बदलला तो पुन्हा घराकडे धावू लागला.

घराच्या दाराजवळ जाऊन मुलगा घरात एकटाच त्याच्या गाडी सोबत खेळत आहे. हे पाहून त्याला धीर आला व तो दरवाजातच बसून राहिला आणि रडू लागला त्याचे रडणे ऐकून मुलगा जवळ आला आणि म्हणाला पप्पा पप्पा....तुम्ही का रडता ! अशे बोलून मुलगा म्हणाला मी तुमची केव्हाची वाट पाहत आहे! बुवा आला आहे आपल्या आतल्या खोलीत आहे. मी मम्मी ला उठवण्याचा प्रयत्न केला पण मम्मी फार गाड झोपी गेली आहे.
पप्पा उठा ना तुम्ही दरवाजा लावा ! काय बुवा आला आहे आणि तो खोलीत आहे ! हे ऐकून त्याचा राग पुन्हा अनावर झाला त्याने पुन्हा पडलेला पाटा-वरवंटा उचला आणि बुवा ला मारण्यासाठी तो आतल्या खोलीत गेला तोच त्याचा मुलगा त्याच्या मागोमाग आला व खिडकी कडे बोट करून तो पप्पांना सांगू लागला पप्पा हाच तो बुवा जो आपल्या घरी रोज येतो आणि तो आल्यावर मम्मी दरवाजा लावते ! मुलाच्या तोंडचे ते वाक्य वआणि समोरचे दृश पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आपण हे काय करून बसलो आपण फार मोठी चुकी केली याची त्याला जाणीव झाली आपण कारण मुलगा खिडकी कडे बोट करून दाखवत होता आणि खिडकीत दिसणाऱ्या झाडावरच्या फांदीवर आलेल्या सरड्याला तो बुवा म्हणत होता.

अरे देवा आपण हे काय करून बसलो आपण आपल्या निष्पाप बायकोला विना कारण ठेचून ठेचून मारले तिचा काही दोष नसताना तिच्या चारित्र्यावर आपण संशय घेतला आणि त्या संशया पोटी तिला आपण दारू पिऊन त्रास दिला तिला आपण विनाकारण छळले आणि अखेर संशयाचा राग अनावर झाल्याने तिला आपण मारू टाकले. तिला आपण एकदा सुधा विचारले नाही कि कोण हा बुवा आणि का येतो विचारल असत तरी हा अनर्थ टळला असता आता मी काय करू तसा त्याने हातातला पाटा-वरवंटा बाजूला टाकला व बायकोच्या पायाजवळ जाऊन तिच्या पायाला स्पर्श करून माफी मागू लागला आणि रडी लागला.

आपण हि फार मोठी चूक केली हि त्याच्या लक्षात आली होती पण आता मात्र फार उशीर झाला होता.त्याच्या हातून होत्याचे नव्हते झाले होते. आपल्या संशयाने आपल्याला नको ते करण्यास भाग पाडले म्हणून पश्चातापाचे ओझे आपली शबनम व मुलाला घेऊन दुखी आणि रडत्या चेहऱ्याने तो स्वतः पोलिसांच्या स्वाधीन होण्यास पोलीस स्टेशनात जाण्यास निघाला...

मित्रानो संसार फार अवघड आहे. तो नवरा व बायको यांच्या विश्वासावर चालत असतो त्यामुळे आपल्या जोडीदारावर कधी संशय घेऊ नका आणि आलाच कधी संशय तर बोलून दाखवा निदान होत्याचे नव्हते होणार नाही. एक चुकीचा गैर समज आणि हसत खेळता घराची नासधूस झाली. वेळीच मनातल बोला असता तर कदाचित ती आज जिवंत असती आणि संसार सुखाचा असता.

अशाच इसाफ नीतीच्या गोष्टी ऐकण्यासाठी वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी आमच्या यु टूब चानेल ला नक्की जोडले जा व गोष्ट आवडल्यास आपल्या आयुष्यातील खास लोकांना नक्की शेयर करा कारण ते खुश तर आपणही खुश पुन्हा भेटू पुढच्या गोष्टीत तोवर राम राम ....

आमच्या टेलिग्रामला जोडले जा ! खालील टेलिग्राम नावावर टिक करा 













Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top